PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 28, 2024   

PostImage

संत मुरलीधर महाराज यांच्या साखळी उपोषणामुळे,सुधरायला गाव सारे लोक लागले


विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडादेव येथील हेमांडपंथी मार्कंडा शहराच्या जीर्णोद्वारासाठी हरनघाट पिठाचे पिठाधिकारी संत मुरलीधर महाराज यांनी गेल्या 16 तारखेपासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत जिर्णोद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुद्धा सुरू राहणार,अशी भूमिका घेतली आहे आणि खास म्हणजे संत मुरलीधर महाराज यांच्या साखळी उपोषणाला त्यांच्या भाविक भक्ताने भरभरून साथ देताना दिसून येत आहे.

 बाबा जरी साखळी उपोषण करीत असले तरी त्यांच्या भाविक भक्तांच्या पाठिंब्यावर उपोषणाला खरी रंगत आली,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कंडा गावातील लोकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे आणखीनच साखळी उपोषणाची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो आहे आणि आजच्या घडीला बाबांची ताकद जास्तच वाढली आहे.कारण गावकरी जे करणार,ते राव करणार नाही,अशी प्रचिती दिसायला लागली आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी उपोषण करणारे कदाचित जगातले पहिलेच संत म्हणून मुरलीधर महाराजांची ख्याती सांगताना मन भरून येतो. कारण तिथलं दृश्य तिथली परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आणि अनुभवली सुद्धा आहे. ते दृश्य बघतांना एकीकडे दुःख होतो तर दुसरीकडे आनंदही वाटतो.स्वतःच्या जीवाची परवा न करता बाबांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल बाबांचे मी त्रिवार स्वागत करतो आणि अभिमानाने सांगतो की आजच्या युगात,असा संत होणे नाही.

मुरलीधर महाराज यांनी पुकारलेला साखळी उपोषण वैनगंगेच्या पाण्यासारखं पवित्र आणि निर्मळ आहे.कारण भक्तिमय वातावरणात सुरू असलेला आंदोलन बोध घेण्यासारखा आहे.अखंड हरिनामाचा स्मरण करून अखंड होम यज्ञाच्या साक्षीने भजन कीर्तनात रंगून जाऊन भक्तांनी भान हरपल्याचे नजरेस पडताना दिसतो आहे.बाबांच्या साखळी उपोषणामुळे भाविक भक्तांच्या मनात देखील नवचैतन्य निर्माण झाल्याचा भास होतो आहे.इतके मनोहर दृश्य आहे.

||जन्मो जन्मो आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली|| असं बाबांच्या सहवासात राहत असल्यामुळे मला त्याची प्रचीती यायला लागली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 26, 2024   

PostImage

मार्कंडेश्र्वर देवस्थानाच्या बांधकामासाठी बाबांचे उपोषण सुरूच,उपोषण संपल्याचे राजकीय नेत्यांचे स्टंट …


आमचा हा उपोषण आमरण नसून हा साखळी उपोषण होता पण मी ईश्वरनामा तल्लीन होऊन उपवास सुरू केलं होतं म्हणजे मी आहार घेत नव्हतो हा माझा व्यक्तिगत विचार होता ही गोष्ट माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला मी कळवलं होतं पण.

काल 24 फरवरी ला अकरा वाजता माझ्या प्रकृती दुपारी प्रकृतीत बिघाड आला व माझी बीपी लो झाली तशातच आमुची तहसील दार व चामुर्शी पोलीस निरीक्षक साहेब हे मला एक मंदिराचे बांधकाम सुरू होण्या  संबंधित भारतीय पुरातत्त्व विभाग यांचे पत्र आणून दिले व मला प्राचारू लागले की आपण उपोषण मागे घ्या पण मी कसाबसा त्यांच्याशी चर्चा केलो त्यावेळेस माझा शिष्टमंडळ हजर नसल्याने मी त्यांना नाकारले त्याच वेळे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मला भेट देण्याकरता उपोषणाच्या पेंढार मध्ये येऊन पोहोचले त्यावेळेस माझी प्रकृती गंभीर असल्याने मला त्यात काही समजले नाही.मला त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले.त्यात त्यांनी मला पाठिंबा देत असेही शब्द बोलले की,एक तारखेला काम सुरू झालं नाही तर मी पण आपल्या सोबत आमरण उपोषणाला बसेल,असे वचन देतो पण तुम्ही आता अन्न त्याग करू नका,साखळी पोषण करा येत्या एक तारखेपर्यंत तुमचा साखळी उपोषण राहू द्या असं मला प्रचारण केले हे सत्य आहे पण मी हा उपोषण मागे घेतलेला नाही.

 कारण माझा प्रण आहे,हे मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी मला फारसमजूत घातली आणि त्यांनी मला शरबत पाजला होय,मी साखळी उपोषणाची मला काहीच माहिती नव्हती,हे सगळं काही खाऊन करावं लागतं व मी एक संत असल्यामुळे मी स्वतःच उपासमार केला यात माझा शिष्टमंडळ किंवा स्वयंसेवक यांची काही गलती नाही,हा माझ्या भक्ती व भगवंता मधला खेळ आहे पण या खेळाचा कुणीही राजकारणी किंवा राजकारण करू नका हा साकळी उपोषण येत्या मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत सुरू राहील असे मी आपल्याला विनंती करतो तसेच मला आपल्या पोटाशी घेऊन जे लिंबू शरबत पाजले माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना मी धन्यवाद देतो पण अशी बातमी पूर्ण देशभर पसरवू नका की माझा उपोषण सुटला.

यामुळे ईश्वर कार्याला अडचण पडेल मी समजू शकतो.आपल्याला माझी काळजी आहे पण जे माझे प्राण आहे ते पण समाप्त होईल असेही होऊ शकते ज्यामध्ये मी मार्कंडे विषय जागृती केली ते तिथेच संपून जाईल म्हणून मला माफ करा मी आपला शब्द पाडला आहे.

 मी फळ फ्रुट इतर काही आता घेत आहे पण माझा हा साखळी उपोषण सुरूच आहे मी असा व्यक्त करतो व आपणही मला विनवणी करताना साखळी उपोषण सुरू ठेवा,असं सांगितलं मी श्री संत मुरलीधर स्वामी महाराज आपल्याशी बोलत आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की या देव कार्याला सुख स्वरूपाने व माझ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराला होण्याकरता पाठिंबा जास्तीत जास्त द्यावं पण राजकारण करून किंवा याचा कुठलाही छळ करू नका. माझी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना,माझा आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद मी सत्य बोलतोय आणि हे तितकाच सत्य आहे.मला यातला कुठलाही राजकारण किंवा कुठलाही उपोषणात कधीच मी बसलेला नाही त्यामुळे माझ्या आत्महून झाली असेल.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर

 

मी आपल्या सर्वांना समजतो आणि प्रार्थना करतो की वृत्तपत्र माध्यमातून लोकापर्यंत जो मेसेज जात आहे की महाराजांना उपोषण सोडला याचा मला दुःख होतो कारण माझा साखळी उपोषण पहिले पासून आताही सुरूच आहे म्हणजेच १६ फरवरी ते 29 फरवरी पर्यंत मंदिराचे काम सुरू न झाल्यास माझा आमरण उपोषण सुरू करण्याचा संकल्प होता आणि तो तितकाच सत्य व कटू आहे.मी सगळ्या वृत्तपत्रिका ना विनंती करतो की आपण माझी प्रार्थना ऐकावा आणि मार्कंडेश्वराच्या मंदिराला आपण सहकार्य करावा यात माझी एवढी चूक समजतो की मी साखळी पोषण न करता मी स्वतंत्र उपवास गेलो होतो त्यामुळे ही घटना घडली त्यात कुठलाही कोणताही राजकारण करू नये ही विनंती जय मार्कंडा जय मार्कंडा.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 16, 2024   

PostImage

मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर


मार्कंडेश्वर जीर्णद्धाराच्या बांधकामासाठी बाबांचे भक्त उतरले रस्त्यावर,आता नाही तर कधी नाही ही मागणी घेऊन जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन

विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेश्वराची नगरी मार्कंडा येथील जीर्णोद्वाराचे बांधकाम पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ-दहा वर्षांपासून रेंगाळत आहे आणि त्या बांधकामाकडे प्रशासनाचे तसेच शासनाचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच हीच मागणी घेऊन हरणघाट पारडी देवस्थानाचे पिठाधिकारी संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भर उन्हात आपल्या असंख्य भक्तांच्या साक्षीने सार्वजनिक विभागाच्या विश्रामगृहापासून पायी पायी अंतर कापत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हर हर महादेवाच्या घोषणा देत धडक मारली.

 हजारो भक्तांनी बाबांच्या आंदोलनाला निस्वार्थपणे पाठिंबा दर्शवित केला शासनाचा धिकार. मुख्य कारण म्हणजे आज लोक वर्गणी गोळा करून आपाआपल्या पद्धतीने बाबांचे भक्त गडचिरोली येथे पोहोचले आणि हजारो भक्तांच्या साक्षीने गडचिरोली शहर दुमदुमले.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अडीच वर्षात पूर्ण होऊ शकतो तर मग मार्कंडादेव येथील मार्कंडा देवस्थानाचे बांधकाम मागील दहा वर्षांपासून का रेंगाळत आहे.त्याला कारणीभूत कोण ? असा सवाल संत मुरलीधर महाराज यांनी उपस्थित केला.या मागणीला बाबांच्या आंदोलनात जमलेल्या भक्तांनी टाळी वाजवीत बाबांचे समर्थन केले.

आत्ता नाही तर कधीच नाही याची जाणीव बाबाला आहे आणि बाबाच्या भाविक भक्तगणांना सुद्धा आहे म्हणून बाबाच्या आंदोलना मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.

नंतर संत मुरलीधर महाराज यांच्यासोबत अनेक संत आणि महाराज सुद्धा उपस्थीत होते खास म्हणजे आजच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी श्रीराम प्रभूची नगरी आयोध्या येथील संत हे सुद्धा उपस्थित होते.

संत मुरलीधर महाराज यांचे आज विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारी मार्कंडेश्वराची नगरी मार्कंडा येथे सायंकाळी ४ वाजता पासून साखळी उपोषणाची सुरुवात करणार असून.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात परवानगी घेतलेली आहे हे साखळी उपोषण सात दिवस चालू चालणार असून,जर का जिर्णोद्वाराचे बांधकाम सुरू झाले नाही तर स्वतः मुरलीधर महाराज यांनी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी आता माघार घेणार नाही असं बाबांनी जाहीरपणे आव्हान आधीच केलेला आहे.मार्कंडेश्वर येथील साखळी उपोषणाला बाबांच्या भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा जाहीर केलेला असून संपूर्ण विदर्भाची नजर या आंदोलनाकडे लागणार आहे,हे मात्र सत्य आहे.

 

आणखी वाचा : महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय ?

 

 बाबाच्या या आंदोलनामुळे प्रशासन तसेच शासन सुद्धा गंभीरपणे दखल घेण्यासाठी सज्ज झालेला आहे.आंदोलनाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे आणि आंदोलन सुरू होता त्यावेळेस खासदार अशोक नेते सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या भेटीला आले होते. म्हणून मार्कंडेेश्वराच्या बांधकाम सुरू व्हायला उशीर होणार नाही असं म्हणायला काहीही हरकत नाही.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 9, 2024   

PostImage

मार्कंडेेश्वराच्या जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी मार्कंडा देव येथे …


मार्कंडा देव येथील जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती,तसे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.आणि पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत जिर्णोद्वाराचा बांधकाम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल,असा इशारा दिला होता आणि त्या आंदोलनाची रूपरेषा आखण्याकरिता मार्कंडादेव येथे एक बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीला स्वतः मुरलीधर महाराज यांच्या सोबत पिपरे महाराज,इस्कॉनचे प्रमुख संत परमेश्वर दास महाराज उपस्थित होते. गडचिरोली येथील श्री गोविंद सारडा,बाबुरावजी कोहळे,रमेश बारसागडे आणि सावली तालुक्यातील व चामोर्शी तालुक्यातील बाबांचे भक्तगन पुरुष व महिला सकट मार्कंडा देव येथील नागरिक सुद्धा आपाआपले दुकान बंद ठेवून उपस्थित होते.

मार्कंडा देव येथील जीर्णोद्वाराच्या बांधकामासाठी संत मुरलीधर महाराज यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आजही त्या आंदोलनावर बाबा ठाम आहेत.

असंख्य भक्तगणांनी बाबांना अन्नत्याग आंदोलन करू नका,तुम्हीच आमचे आधारस्तंभ आहात,अशी विनवणी बाबाला आपल्या भक्तांनी व्यक्त केली.

अरे माझा बाप इथे उघड्यावर उभा आहे.त्यांच्या डोक्यावर छत नाही तर मी कसा स्वस्त बसेल,अशी भावना संत मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.मी अन्नत्याग आंदोलन करणार म्हणजे करणार या भूमिकेवर बाबा ठाम राहिले.

बाबा अन्नत्याग आंदोलन करू नका वेळ आली तर सात दिवसांचा साखळी उपोषण करू अन आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर मात्र अन्नत्याग आंदोलन करू,अशी विनंती बाबांच्या असंख्य भक्तांनी व्यक्त करीत बाबांची मनधरणी सुरूच ठेवले.

त्यानंतर बाबांनी आपल्या लेकरांचा विचार करून साखळी उपोषणाला तयार झाले.असंख्य भक्तांच्या साक्षीने येत्या १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ व त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता पासून विदर्भाची काशी मार्कंडा देव येथे मंदिराच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचा,इशारा भाविक भक्तांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू,संत मुरलीधर महाराज यांचा इशार

 

आजच्या कार्यक्रमाला गडचिरोली, चामोर्शी व सावली तालुक्यातील २०० ते ३०० बाबांचे भक्तगण महिला सहित उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 4, 2024   

PostImage

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मार्कंडेश्वर जीर्णोद्वार बांधकामासाठी तातडीची आढावा बैठक,संत …


मार्कंडा देव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्वार बांधकामासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत,एक तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

 या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे आणि जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या सोबतच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

मार्कंडेश्वर हेमांडपंथी मंदिराचे जीर्णोदवार खोलून आठ ते दहा वर्ष झाले असून ते काम मात्र,आजही जैसे थे आहे.विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन उत्तर वाहिणी मार्कंडेय मार्कंडेश्वराचे जिर्णोदवार लवकरात लवकर बांधण्यात यावे,अशी मागणी घेऊन हरनघाट-पारडी देवस्थानाचे पिठादिश संत मुरलीधर महाराज यांनी 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना आपल्या असंख्य भक्तानां सोबत घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले.

मार्कंडेेश्वराच्या जिर्णोद्वाराचे बांधकाम पंधरा दिवसात सुरू करण्यात यावे आणि जर का जिर्णोद्वाराचे काम सुरू झाले नाही,तर मी माझ्या असंख्य भक्तांच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करेन,असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आणि मार्कंडा देव परिसरातील भाविक भक्तांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला.

 संत मुरलीधर महाराज यांनी पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता.त्यांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीर्णोदवार बांधकामासाठी घेतलेली तातडीची बैठक,यावरून संत मुरलीधर महाराज यांच्या कार्याला यश आला असं बाबाच्या भाविक भक्तांनी भावना व्यक्त केली.

खास म्हणजे आढावा बैठक संपल्यानंतर संत मुरलीधर महाराज यांनी स्वतः पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि मार्कंडेश्वर जीर्णोद्वाराचे बांधकाम लवकर सुरू करावे,अशी कळकळीची विनंती करताना बाबा अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडले,हे उल्लेखनीय आहे.

 

आणखी वाचा : मार्कंडेश्वर मंदिराचे जीर्णोदवार बांधकाम तात्काळ सुरू करा, अन्यथा आमरण उपोषण 

 

 आज मार्कंडा देव येथे सावली,पारडी,कवठी,घारगाव, रामाळा, मोहूर्ली,फराडा,भेंडाळा,वाघोली, नवेगाव,मुरखळा,सगणापूर,कानोह्ली, एकोडी,कळमगाव,शंकरपूर हेटी,आष्ठी,अनखोडा,उमरी,कढोली, जैरामपूर,मूधोली,घोट तसेच चामोर्शी व सावली तालुक्यातील बरेच गावातून बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 31, 2024   

PostImage

मार्कंडेश्वर देवस्थानचे प्रलंबित जिर्णोद्धार काम तात्काळ सुरू करा,अन्यथा उपोषण,परमपूज्य संत …


 

    चामोर्शी :-विदर्भाची काशी म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळख असलेले चामोर्शि तालुका मुख्याल्यापासून अगदी जवळ असलेल्या वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी स्थळी वसलेले हेमांडपंथी मार्कंडेश्वर देवस्थान असून.ह्या देवस्थानचे जिर्णोद्धारचे काम गेल्या आठ वर्षांपासून बंद असल्याने,या स्थळी येणाऱ्या भाविकांमध्ये शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात रोष व्यक्त केले जात आहे. त्यासाठी जीर्णोद्धारचे काम मार्गी लावा अन्यथा १५ फरवरी पासून उपोषणाला बसणार असल्याचे हरंनघाट येथील परमपूज्य श्री कार्तिक स्वामी महाराज यांच्या शिस्टमंडळाने गडचिरोली जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    चांमोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कडेश्वर देवस्थान या धार्मिक स्थळी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त दहा - पंधरा दिवस यात्रा भरत असते या यात्रेला महाराष्ट्र, व बाहेर राज्यातील येणाऱ्या भाविकांना गेल्या दहा वर्षांपासून मार्कंडेश्र्वर मंदिराचा गाभारा जीर्णोदधाराच्या कामा मुळे बंद असल्याने भाविकांना शिव पिंडीचे दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. 

 

 

मंदिर जिर्णोद्धार चे काम सुरू करण्यास या अगोदर देवस्थान ट्रस्ट यासह अनेक संस्था, संघटना भाविक आदींनी शासनाकडे , भारतीय पुरातत्व विभाग, मंत्री ,खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी कडे सतत पाठपुरावा केला पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिर्णोद्धारचे काम रेंगाळले आहे.त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत,त्यांसाठी त्यांच्या भावना लक्षात घेऊन देवस्थानचे प्रलंबित जिर्णोद्धार काम तात्काळ सुरू करण्यासाठी आपल्या स्तरावरून दखल घ्यावी अन्यथा मंदिरासमोर १५ फरवरी पासून उपोषनावर नाइलाजाने बसनार असल्याची. अशी मागणी हरणघाट पार्डी चे परमपूज्य श्री संत मुर्लिधर महाराज , इस्कॉनचे परमेश्वर दास महाराज, राधा श्यामसुंदर दास, नीलकंठ कोहळे, सूरज बोरकुटे,सुनील दीक्षित,रितेश पालारपवार, रमेश चौखूंडे,शामराव धोबे,अक्षय पोरटे, भावराव पाल,गुणाजी पिटाळे, हेमंत खेडेकर, मुकतेश्र्वर चुधरी, तोताजी आभारे,देविदास देशमुख,अशोक डायकी, भैयाजी कुनघाडकर,अविज पोरटे,किशोर महशाखेत्री, मेघराज पोरटे,

 

आणखी वाचा : आमदार होळी साहेब, तुमच्या राज्यात चाललंय काय?

 

रवींद्र अग्लोपवार, सुनील बोमनवार , भास्कर बुरे, शेषराव कोहळे, निरज रामानुजमवार, सेवकराम बोरकुटे, उमेश पिटाले, अतुल निरकुरवार, रुपेश पित्तलवार, गोविंद सारडा, गजानन ढोले, श्रीकांत बेहेर, विनोद भोयर, नरेंद्र जक्कुलवार, मारोती उमलवार, सुशील, प्रशिक घोगरे आदीच्या शिस्टमंडळाने निवेदन गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी केली करत निवेदनाच्या प्रती गडचिरोली पोलिस अधीक्षक, चमोर्शीं तहसीलदार, पोलिस निरीक्षक व खासदार, आमदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 30, 2024   

PostImage

मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू,संत …


मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराचे मंदिर बांधकाम पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू पणामुळे तब्बल आठ वर्षांपासून रखडलेल असून ते त्वरित सुरू करावे अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू असा, गर्भित इशारा हरणघाट पारडी येथील मठाधिपती संत मुरलीधर महाराज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेद्वारा द्वारे कळविण्यात आले.

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचे मंदिर आहे आणि त्या मंदिराचे जीर्णोद्वार खोलून पुरातत्व विभागाने नवीन जीर्णोद्वार निर्माण करण्याचे कार्य हाती घेऊन, आजच्या घडीला आठ वर्षे पूर्ण झाले. परंतु मंदिराचे बांधकाम जैसे थे,अशा परिस्थितीतच आहे.

पुरातत्त्व विभागाने मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे,या मागणीसाठी संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन मागणी केली.या निवेदनात 15 दिवसाची मुदत देण्यात आली असून.काम सुरू झालं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन करू,असा इशारा देण्यात आला.

आपले वडील मरण पावले तर त्यांची असती विसर्जन आम्ही विदर्भाचे काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या गंगकोटी विसर्जित करतो मग अशा पवित्र ठिकाणी माझा बाबा (देव) जर उघड्यावर असेल तर ते मी नाही सहन करू शकत.मंदिर बांधकामासाठी मी माझा देह अर्पण केलेला आहे,आता याता माझा जीव गेला तरी मी मागे फिरणार नाही,असा गर्भित इशारा संत मुरलीधर महाराज यांनी व्यक्त केला.

 

आणखी वाचा : पाडवा गोड झाला

 

आता जीव गेला तरी मागे फिरणार नाही.जोपर्यंत मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,अशी भीष्मप्रतिज्ञा संत मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.ही मागणी रास्त असून मंदिर निर्माण झालाच पाहिजे, अशी मार्कंडा परिसरातील भक्तांची मागणी असून या आंदोलनात बरेच भाविक सहभागी होणार आहेत, हे मात्र सत्य आहे.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 26, 2024   

PostImage

मार्कंडेेश्वराच्या बांधकामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष,मुरलीधर महाराज यांनी वेधले लक्ष


 

विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकडे पुरातत्त्व विभागाने आठ वर्षापासून मंदिर खोलून,आजपर्यंत त्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत ? यासाठी हरणघाट मंदिराचे मुरलीधर महाराज यांनी मार्कंडा देव येथे बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या.

चामोर्शी तालुक्यापासून अवघ्या आठ किमी अंतरावर मार्कंडेश्वराचा देवस्थान आहे.परंतु पुरातत्व विभागाकडून मंदिराचे बांधकाम करण्यासाठी तयार असलेले मंदिर खोलल्या जाऊन आज आठ वर्षे पूर्ण होऊन गेले,तरीपण अजूनही मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होऊन सुद्धा,आठ वर्षांपासून हा बांधकाम का रोखल्या गेले आहे ?, हे आजही गुलदस्त्यात आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.

पुढे दोन महिने गेले की मार्कंडा देव येथे मार्कंडेश्वराची खूप मोठी जत्रा भरते आणि संपूर्ण विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात,मग विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिराकडे पुरातत्त्व विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे की, काय ? असा प्रश्न निर्माण होतोय.

हरणघाट मंदिराचे मुरलीधर महाराज याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत,मार्कंडा परिसरातील भाविकांची बैठक बोलावून मंदिराचे काम का बंद आहे,याची चौकशी केली.मंदिरातील ट्रस्टचे पदाधिकारी थातूर-मातूर उत्तरे देऊन, आपाआपले अंग काढून घेण्याचे प्रयत्न केरीत होते.

मार्कंडेश्वराचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी,मी माझ्या परीने प्रयत्न करेन आणि जोपर्यंत मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार नाही, तोपर्यंत मार्कंडा देवस्थान या नगरीत पाय ठेवणार नाही,अशी भीष्म प्रतिज्ञा मुरलीधर महाराज यांनी बोलून दाखवली.

 

आणखी वाचा : विदर्भाची काशी विकासाच्या प्रतीक्षेत..

या बैठकीसाठी मार्कंडा, फोकुर्डी,रामाळा,फराडा,भेंडाळा, सगणापुर, चामोर्शी,शंकरपूर हेटी,चांदापूर,पारडी,दोटकूली व बऱ्याच गावचे भावीक उपस्थित होते. पुरातत्व विभाग कानाडोळा करीत असेल तर आम्ही वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करू,असा निर्धार भाविकांनी व्यक्त केला.